एमपीसी न्यूज – तळवडे चौकाजवळ वळण घेणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी (Dehuroad)वरील दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि. 2) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास घडला.
केतन केशव पवार (वय 23, रा. यमुनानगर, निगडी), अलोक रंजन अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर वेंकटी पवार (वय 34, रा. यमुनानगर, निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (एमएच 14/केए 7262) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nigdi : खून प्रकरणातील आरोपीला पुणे शहरातून अटक; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नातेवाईक केतन पवार आणि त्यांचा मित्र हे महिंद्रा कंपनी, चाकण येथे शुक्रवारी मुलाखतीसाठी गेले होते. मुलाखत देऊन घरी येत असताना तळवडे चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला वळण घेणाऱ्या टेम्पोने धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील दोघे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.