एमपीसी न्यूज – लोणावळा परिसरात (Lonavala Rain) मागील 24 तासात 232.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच रविवारी (दि. 4) पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी लोणावळा परिसरासह पुणे जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील सर्व धरणे भरली आहेत. तसेच सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मावळ तालुक्यात लोणावळा परिसर हा घाटमाथ्यावरील परिसर आहे. त्यामुळे या परिसरात तालुक्यातील इतर भागापेक्षा अधिक पाऊस पडतो.
Rajasthan : गुन्हा दाखल झालेल्या आरोपींकडून पीडित तरुणीवर लग्नासाठी पुन्हा दबाव
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार लोणावळा परिसरात (Lonavala Rain) मागील 24 तासात 232.5 mm पावसाचे नोंद झाली आहे. हा पाऊस पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस आहे. तर मावळ तालुक्यातच असलेल्या तळेगाव शहरात मागील 24 तासात 40 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात आज अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे.