एमपीसी न्यूज – पुण्यातील जागतिक दर्जाचे आयटी हब अशी (Hinjawadi)ओळख असणाऱ्या ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या काही केल्या सुटत नाही. इथले अरुंद आणि खड्डेमय रस्ते, स्थानिक स्वराज्य संस्था, एमआयडीसी यांच्याकडून उपाययोजनांसाठी होणारी दिरंगाई यामुळे हिंजवडी परिसरात दिवसेदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. याचा स्थानिकांसह आयटीयन्सना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आयटी पार्क हिंजवडी मधील वाहतूक कोंडी हा कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातच या ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे (पुणेरी मेट्रो) काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता अडविण्यात आलेला आहे. मधल्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीची कोंडी फोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र त्यानंतर खड्डेमय रस्त्यांवर साधी मलमपट्टी देखील झालेली न
Talwade : विक्री कर थकवल्या प्रकरणी तळवडे येथील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
वाहतूक कोंडी आणि इतर समस्या दूर करण्यासह या परिसरात नवीन उद्योग येण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. या परिसरातील उद्योग, कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांच्या सोयीच्या दृष्टीने परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधा गतीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले होते.
मागील काही वर्षांचा विचार करता हिंजवडी आयटी परिसरात वाहनांची एव्हढी रहदारी नव्हती. या परिसरात येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या, तसेच परिसरात उभे राहणाऱ्या पूरक उद्योग-व्यवसायामुळे या भागात रहिवाशी आणि वाहनांची संख्या वाढत आहे. हिंजवडी परिसराचा वेगाने विकास करण्यासाठी या परिसरात पायाभूत सुविधांची गतीने उभारणी करणे गरजेचे आहे. मात्र या सुविधा उभारण्याचा वेग अतिशय कमी आहे.
पुण्याच्या विविध भागांतून उद्योग, नोकरीनिमित्त हिंजवडी आयटी परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत याठिकाणचे रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या भागातील रस्ते रुंद करावेत, सर्वच रस्त्यांवर सहा मार्गिका ठेवाव्यात, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत, सेवारस्त्यांची रुंदी वाढवावी, उड्डाणपुलांच्या ठिकाणी असलेल्या केबल्ससाठी भूमिगत व्यवस्था उभारावी. अनधिकृत केबल्स काढून टाकाव्यात. रस्त्यालगत उभारण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकून या परिसराचे सौंदर्यीकरण पूर्ववत करण्यात यावे. रस्त्यांवरील खड्डे भरावेत, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामेही तात्काळ मार्गी लावावीत. एमआयडीसी परिसराबाहेरील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था उभारण्यासारख्या उपायोजना करणे गरजेचे आहे.