एमपीसी न्यूज : जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. दक्षिण जपानमध्ये 6.9 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला. भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण जपानमधील मियाझाकी येथे होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरून घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले.
PCMC : 575 युवकांना महापालिकेच्या विविध विभागात कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी
काही अहवालांमध्ये भूकंपाची तीव्रता 7.1 असल्याचे सांगण्यात आले. त्याचे केंद्र क्युशूच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर होते. जपानच्या दक्षिणेकडील मुख्य बेटावर क्यूशूच्या दक्षिणेकडील किनारपट्टी आणि शिकोकूच्या जवळच्या बेटावर 1 मीटरपर्यंत लाटांचा इशारा देण्यात आला होता. याआधी 1 जानेवारी रोजी जपानच्या उत्तर-मध्य प्रदेशात नोटो येथे झालेल्या भूकंपात 240 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.