एमपीसी न्यूज – एक पावसात भिजून गतप्राण झाला तर एकाला उडता येत (Maval) नव्हते, अशा दोन घुबडांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी जीवनदान दिले. त्यांची सुश्रुषा करून त्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडले.
मावळ तालुक्यातील शिलाटणे या गावात दोन घुबड आढळून आले. त्यातील एक घुबड मुसळधार पावसात भिजल्याने गतप्राण झाला होता. तर दुसरा घुबड उडू शकत नव्हता. दोघांनाही वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने पकडले.
Mumbai : मुंबई भाजप उपाध्यक्षपदी पवन संघवी यांची नियुक्ती
पावसात भिजलेल्या घुबडाला सुरक्षित पकडून उबदार ठिकाणी ठेवले. त्यानंतर त्याची योग्य सुश्रुषा केली. त्याची नियमित तपासणी आणि आहाराकडे लक्ष देण्यात आले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
उडू शकत नसलेल्या घुबडाची देखील योग्य काळजी घेऊन त्याला उडण्यासाठी सज्ज करण्यात आले. त्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. शिरोता वनपरिक्षेत्राचे अधिकारी सुशील मंतावर, वनरक्षक श्री चव्हाण, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संकेत भानुसघरे, संभाजी भानुसघरे, जिगर सोलंकी, रोहित पवार यांनी यासाठी परिश्रम घेतले.
परिसरात एखादा वन्य प्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास तात्काळ वन विभागात अथवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला माहिती द्यावी, असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी केले (Maval) आहे.