एमपीसी न्यूज – निष्ठावान आणि आक्रमक कार्यकर्ते पवन संघवी यांची दक्षिण मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती (Mumbai) करण्यात आली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.
भाजपा दक्षिण मुंबई विस्तारित कार्यकारिणीची बैठक बुधवारी शारदा मंदिर स्कूल येथे पार पडली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शरद चिंतनकर यांनीही मार्गदर्शन केले. संघठन मंत्री राजेश मिश्रा पक्षाने केलेल्या कामाची माहिती दिली.
Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगटची निवृत्तीची घोषणा
माजी आमदार राज पुरोहित, शायना एनसी, शरद पेटीवाला यांच्यासह दक्षिण मुंबई के माजी नगरसेवक, भाजपा राजस्थान सेल मुंबई के महामंत्री अमृतलाल जैन, कल्पेश सालेचा यासह 300 पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित (Mumbai) होते.