Explore

Search
Close this search box.

Search

May 24, 2025 6:00 am

MPC news

Paris Olympic : भारताने पुन्हा एकदा पटकावले कांस्यपदक; हॉकी संघाची पॅरिसमध्ये कामगिरी

एमपीसी न्यूज : भारतासाठी पॅरिसमधून मोठी बातमी समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले आहे. यासह भारताने या ऑलिम्पिकमध्ये 4 पदके जिंकली आहेत. हे सर्व कांस्य आहेत. मागील तीन कांस्यपदके नेमबाजीत जिंकली आहेत. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये प्रथम कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मनू भाकरनेही मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. सरबज्योत सिंगही तिच्या सोबत संघात होता. स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले.

Japan Earthquake : जपानमध्ये भूकंपाचे धक्के; त्सुनामीचा इशारा!

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत त्यांनी स्पेनचा 2-1 असा पराभव केला. हॉकीमधील भारताचे हे चौथे कांस्यपदक आहे. याशिवाय देशाने ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक 8 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले आहे. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर