एमपीसी न्यूज – पुणे शहरात दोन वेगवेगळ्या (Pune) प्रकरणांमध्ये शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वायुसेना आणि नैदालातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. दोन अधिकाऱ्यांची तब्बल एक कोटी तीस लाखांची फसवणूक झाली आहे. व्हाटस अप द्वारे संपर्क करत सायबर गुन्हेगारांनी दोन्ही अधिकाऱ्यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले होते.
वायुसेनेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला अपर सर्किट स्टॉक आणि आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यास सायबर गुन्हेगारांनी भाग पाडले. त्यातून निवृत्त अधिकाऱ्याची 77 लाख रुपयांची फसवणूक केली. तर दुसऱ्या प्रकरणात नौदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला शेअर ट्रेडिंगचे क्लास लावण्याच्या बहाण्याने 54 लाखांचा गंडा घालण्यात आला.
Bhosari : ‘श्रावणसरी अन् मंगळागौरी’ महोत्सवामध्ये महिलांची ‘धम्माल’
सोशल मिडियावर आलेल्या एका जाहिरातीवर वायुदलातील निवृत्त अधिकाऱ्याने क्लिक केले. त्यानंतर त्यांना एका व्हाटस अप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात आले. त्यांना गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष (Pune) दाखवण्यात आले. सायबर गुन्हेगारांनी खोटा इलेक्ट्रोनिक अभिलेख तयार करून त्यात निवृत्त अधिकाऱ्याने गुंतवलेल्या 77 लाखांच्या बदल्यात चार कोटी तीन लाख रुपये जमा झाल्याचे दाखवण्यात आले. ती रक्कम काढून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेगवेगळ्या कारणांसाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली.
नौदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला सुरुवातीला ट्रेडिंगशी संदर्भात काही व्हिडीओ पाहण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना एक एप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यातून गुंतवणूक करण्यास भाग पाडत त्यांचीही 54 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. पुणे सायबर पोलीस तपास करीत आहेत.