Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 8:20 am

MPC news

Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगटची निवृत्तीची घोषणा

एमपीसी न्यूज – सर्वांना आश्चर्याचा धक्का देत कुस्तीपटू( Vinesh Phogat)  विनेश फोगटने निवृत्ती जाहीर केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटने गुरुवारी कुस्तीला अलविदा करण्याचा मोठा निर्णय घेतला.

विनेशने आपल्या एक्स अकाउंटवर एक भावनिक संदेश शेअर करत निवृत्ती जाहीर केली आहे. तीने आपलं दु:ख व्यक्त करताना म्हटले,  “आई, कुस्ती माझ्याकडून जिंकली, मी हरली, माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व तुटले आहे. माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती…असे लिहित विनेश फोगाट हिने देशवासियांची माफी मागितली.

याआधी कुस्तीपटू विनेशने क्रीडा लवादाकडे संयुक्तपणे ऑलिम्पिक रौप्यपदक देण्याची विनंती केली होती. त्याच याचिकेवर आज निर्णय अपेक्षित आहे. मात्र, या निर्णयापूर्वीच विनेश फोगटने निवृत्तीची घोषणा करून तिच्या लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

Chinchwad : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात खळबळ; तीन वरिष्ठ निरीक्षक तडकाफडकी नियंत्रण कक्षाशी संलग्न

बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीसाठी विनेशचे वजन 50 किलोपेक्षा (Vinesh Phogat) जवळपास 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे नियमानुसार तिची परवानगी नाकारली गेली. मात्र या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच धक्का बसला आणि आज निवृत्तीची घोषणा करत लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित ( Vinesh Phogat) केले.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर