Explore

Search
Close this search box.

Search

March 21, 2025 4:54 pm

MPC news

Chinchwad : चिंचवडमध्ये रंगणार भारतीय संस्कृती जपणारी चॅरिटी सौंदर्य स्पर्धा

एमपीसी न्यूज – कशिश प्रॉडक्शनच्या वतीने (Chinchwad) आणि कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने यंदा राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय संस्कृती वेशभूषा असा एक वेगळा विभाग असणार आहे. या अंतर्गत भारतातील विविध राज्यातील परंपरा, संस्कृती, वेशभूषा स्पर्धक सादर करतील. येत्या 22 सप्टेंबर 2024 रोजी एल्प्रो मॉल सभागृहात, चिंचवड येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. जगदंबा ज्वेलर्स प्रस्तूत या सौंदर्य स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून लाखोंच्या संख्येने महिलांसाठी सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात येणार आसल्याची माहिती, कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे ‘पॅडमॅन’योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी जगदंबा ज्वेलर्सचे डॉ. अजय कुमार कारंडे आणि स्पर्धेच्या ब्रँड ॲम्बेसेडर सोना अशोक म्हात्रे,संगिता आळशी,पूर्णिमा लुणावत, अर्चना माघाडे उपस्थित होते.

स्पर्धेची माहिती देताना ‘पॅडमॅन’ योगेश पवार म्हणाले, राज्यस्तरावर कशिश प्रॉडक्शन आणि कशिश सोशल फाउंडेशन ने अनेक उपक्रम राबवले आहेत. मात्र यंदा देशपातळीवर हा उपक्रम राबवला जाणार आहे. महिला, पुरूष आणि लहान मुलं या तिन्ही विभागात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठीची नावनोंदणी सध्या सुरू आहे. या सौंदर्य स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून देखील पुणे, मुंबई व जम्मू काश्मीर या भागातील गरजू महिलांना सॅनिटरी पॅड चं वाटप होणार आहे.

Lonavala : वन वे मधून वाहने दामटणाऱ्या 200 जणांवर कारवाई

स्पर्धे विषयी बोलताना डॉ. अजय कुमार कारंडे म्हणाले, व्यावसायिक (Chinchwad) म्हणून अनेक क्षेत्रांमध्ये मी कार्यरत आहे. पण व्यवसाय करता करता उत्कर्ष फाउंडेशन मार्फत समाजकार्य करायची आवड ही मला आधीपासूनच होती. ह्या शो चा उत्तम हेतू पाहता इथे सहभाग नोंदवण्याची इच्छा मी दर्शवली. माझ्या कडून सगळ्या स्पर्धकांना खूप शुभेच्छा.

स्पर्धेच्या ब्रँड ॲम्बेसेडर सोना अशोक म्हात्रे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती केली जात आहे. असंख्य महिलांना या मार्फत सॅनिटरी पॅड च वाटप करण्यात आलं आहे. महिलांच्या सौंदर्या बरोबरच त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेणाऱ्या या उपक्रमांचा मला भाग होता आलं याचा मला आनंद आहे. स्पर्धेची ब्रँड ॲम्बेसेडर आणि क्राऊन विनर या नात्याने या समाजाची देखील मी काही देणं लागते. या उपक्रमात सहभागी होवून मी माझी जबाबदारी पार पाडणार आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर