एमपीसी न्यूज – क्रांती दिनानिमित्त शुक्रवार(दि.9) दुपारी मुंबईहून येणार्या (Chinchwad) रेल्वेतून ब्रिटिश अधिकार्या समवेत चिंचवड रेल्वे स्थानकावर चक्क महात्मा गांधीजी उतरले अन् त्यांच्या जयघोषाच्या जल्लोषाने प्रवासी चकित झाले. 9 ऑगस्ट 1942 रोजी ‘चले जाव!’ आंदोलन पुकारल्यामुळे महात्मा गांधी यांना अटक करून पुण्यात पाठविण्यात आले होते; परंतु जनक्षोभ उसळू नये म्हणून चिंचवड रेल्वेस्थानकावर त्यांना उतरवून घेण्यात आले होते. शब्दधन काव्यमंचाने या प्रसंगाचे अभिरूप दर्शन घडवून रेल्वेस्थानकावर महात्मा गांधी विचार जागर या ऐतिहासिक कवी संमेलनाचे आयोजन केले होते.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. एस. आगरवाल महात्मा गांधींच्या आणि सुभाष चव्हाण इंग्रज अधिकार्याच्या वेशभूषेत सहभागी झाले होते; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सह संयोजक प्रकाश क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, उपाध्यक्ष मुकेश चुडासामा, चिंचवड रेल्वेस्थानक प्रबंधक मॅथ्यू जॉर्ज, ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, अशोक महाराज गोरे, राजेंद्र घावटे, कैलास भैरट, प्रकाश घोरपडे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.
Pimpri : बोलावूनही न गेल्याने रागातून एकाला बेदम मारहाण
बाल कवयित्री सानिका जोशी पासून ते ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांच्यापर्यंत सुमारे तीस कवींनी आपल्या देशभक्तिपर रचनांनी वीरश्रीपूर्ण वातावरणनिर्मिती केली होती. यामध्ये शोभा जोशी, अरुण कांबळे, सीमा गांधी, बाळकृष्ण अमृतकर, शामला पंडित, आय. के. शेख, अण्णा जोगदंड, अण्णा गुरव, योगिता कोठेकर, शामराव सरकाळे, आत्माराम हारे, रशिद अत्तार, जयवंत पवार यांच्या रचना उल्लेखनीय होत्या.
कविवर्य रघुनाथ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तिपर घोषणा दिल्या. नामदेव हुले, आनंद मुळूक, राजू जाधव, फुलवती जगताप, शरद काणेकर, राजेंद्र पगारे, सुंदर मिसळे, काळुराम सांडगे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले. वंदेमातरमने कार्यक्रमाचा समारोप करण्यात (Chinchwad)आला.