एमपीसी न्यूज – लोणावळा (Lonavala ) शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी काही मार्गांवर एकेरी वाहतूक (वन वे) केली आहे. मात्र अनेकजण या नियमांचे उल्लंघन करून अरुंद रस्त्यावरून दुहेरी वाहतूक करतात. त्यामुळे लोणावळा शहर पोलिसांनी मोहीम राबवत 200 जणांवर कारवाई केली आहे.
लोणावळा शहर आणि परिसर निसर्गसंपन्न आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. पावसाळ्यात शहर परिसरात विशेष गर्दी असते. काही भागात अरुंद रस्ते असल्याने पावसाळ्यात इथे वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवते. त्यामुळे पोलिसांनी काही मार्गांवर एकेरी वाहतूक सुरु केली आहे.
Pimple Gurav : पिंपळे गुरव येथे हिट अँड रन! चारचाकीने दुचाकीस्वारास फरफटत नेले
जून महिन्यापासून लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी नदी भांगरवाडी दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. बाजार पेठेतील गर्दी कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. तरीही अनेक वाहन चालक या एकेरी मार्गावरून वाहने दामटतात. या वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. 8) विशेष तपासणी मोहीम राबवली.
एकेरी वाहतूक असलेल्या मार्गावर विरुद्ध (Lonavala) दिशेने येणाऱ्या 200 वाहन चालकांवर पोलिसांनी एका दिवशी कारवाई केली. त्यांच्यावर एक लाख 33 हजारांचा दंड करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढे देखील सुरु राहणार असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले.