एमपीसी न्यूज : सोलापूर महामार्गावर (Pune) कदम वस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलच्या समोर धावत्या बसने पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे संपूर्ण नुकसान झाले आहे.
Pune : किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांनी डोक्यात दगड घालून केला एकाचा खून
सदरची घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदरची बस हैदराबाद वरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करीत (Pune) होते. ही बस कदम वस्ती ग्रामपंचायत येथे आली असता गाडीचा टायर फुटला व गाडीने पेट घेतला. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.