एमपीसी न्यूज : पुणे झोन मधील इंदिरानगर (Pune) ब्रांच येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन चिंतामणराव देशमुख प्राथमिक विद्यालय, इंदिरानगर या ठिकाणी रविवार दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आले आहे. मिशनचे स्वयंसेवक आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजित करण्यात येतात. ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते.
Pune : जुन्नरमधील कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेस 2 कोटी रुपये मंजूर
आपण मानव आहोत तर रक्तदान करणे हे आपले मानवीय कर्तव्य आहे. रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या व्यक्तीशी रक्ताचे नाते जोडू शकतो. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे आपण सर्वानी (Pune) या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन इंदिरानगर प्रमुख अनंत दळवी जी यांनी केले आहे.