एमपीसी न्यूज – कॅफेमध्ये मुला-मुलींना बसून अश्लील चाळे करण्यासाठी ( Ravet ) जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास डी वाय पाटील रोड, रावेत येथील यु अँड मी कॅफे मध्ये करण्यात आली.
महेश अजिनाथ जाधव (वय 27, रा. रावेत) असे गुन्हा दाखल झालेल्या कॅफे चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधा टोके यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथून तरुणी बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश जाधव याने डी वाय पाटील रोड, रावेत येथे यु अँड मी या नावाने कॅफे सुरु केला. त्यासाठी त्याने कोणताही परवाना घेतला नाही. तसेच त्याने कॅफे शॉपमध्ये लहान लहान कप्पे करून त्यात मुला-मुलींना बसून अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. रावेत पोलीस तपास करीत ( Ravet ) आहेत.