एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रा ( Shivswarajya Yatra)आज (शुक्रवारी, दि. 9 ऑगस्ट) सुरु झाली. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालताना क्रेनचा किरकोळ अपघात झाला. यावेळी क्रेनमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, महेबूब शेख हे चौघेजण होते. क्रेनची ट्रॉली बिघडल्याने हा अपघात झाला. मात्र या अपघाताची राज्यभर साधक बाधक चर्चा सुरु आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरून आपल्या शिवस्वराज्य यात्रेला शुक्रवारी प्रारंभ केला. या यात्रेच्या सुरुवातीला शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
PCMC : 11 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करत 40 हजार रुपये दंड वसूल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी क्रेन लावण्यात आली होती. त्या क्रेनवर ट्रॉली बसवण्यात आली होती. ट्रॉलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिलाध्यक्षा रोहिणी खडसे, युवकाध्यक्ष महेबूब शेख हे चौघेजण होते.
त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ट्रॉली खाली येत असताना एका बाजूला अचानक झुकली. ट्रॉली मधील चौघेही पडता पडता थोडक्यात बचावले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर ट्रॉली सावकाश खाली आणली गेली, सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. नेते सुखरूपपणे खाली उतरल्यानंतर शिवस्वराज्य यात्रा सुरु करण्यात ( Shivswarajya Yatra) आली.