एमपीसी न्यूज – तीन तासांच्या फरकाने सिक्कीम (Sikkim Earthquake ) आणि हिमाचल प्रदेश मध्ये भूकंप झाला. सुदैवाने दोन्ही भूकंपाची तीव्रता कमी असल्याने मोठे नुकसान झाले नाही. मात्र दोन्ही ठिकाणी परिसरात जोरदार हादरे बसले आहेत. याबाबत नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र) याबाबत माहिती दिली आहे.
सिक्कीम राज्यातील सोरेंग येथे शुक्रवारी (दि. 9) सकाळी 6.57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक घरे हलू लागल्याने नागरिकांनी घरातून काढता पाय घेतला. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आतमध्ये 10 किलोमीटर होते. याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल एवढी होती.
सिक्कीम मधील भूकंपानंतर अवघ्या तीन तासाच्या फरकाने सकाळी 9.53 वाजता हिमाचल प्रदेश मधील मंडी येथे भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या खाली 5 किलोमीटर होते. याची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल एवढी होती.
Chinchwad : चिंचवडमध्ये रंगणार भारतीय संस्कृती जपणारी चॅरिटी सौंदर्य स्पर्धा
गुरुवारी (दि. 8 ऑगस्ट) जपानमध्ये भूकंप झाला. याचे केंद्र जमिनीच्या आतमध्ये 50 किलोमीटर होते. तरी देखील या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल एवढी प्रचंड होती. जपानच्या दक्षिण किनारपट्टीवर क्युशू बेटावरील मियाझाकी प्रांतातील निचिनान शहर आणि आसपासच्या भागात या भूकंपाचे धक्के जाणवले.
याच्या अगोदर 7 ऑगस्ट रोजी म्यानमार मध्ये भूकंप आला. हा भूकंप 4.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.
भूकंप आल्यावर अशी घ्या काळजी
तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये असाल तर मजबूत टेबल, बेड खाली आसरा घ्या. टेबल नसेल तर (Sikkim Earthquake ) आपला चेहरा आणि डोकं हाताने झाकून घ्यावं आणि इमारतीच्या कोपर्यात गुडघ्यावर बसावं. जर तुम्ही इमारतीच्या बाहेर असाल तर झाड, वीज खांब, तारापासून दूर राहा. इमारतीतून बाहेर पडत असताना लिफ्टचा उपयोग टाळा. अशा वेळी केवळ जिन्याचा वापर करा. कार चालवत असताना भूकंपाचे धक्के जाणवू लागले तर शक्य तेवढ्या लवकर कार थांबवा आणि कारमध्येच बसून रहा. कार थांबवताना आपण उड्डाणपूल, मोठी इमारत, विजेच्या तारा, विजेचे खांब, झाड यांच्या बाजूला नसल्याची खात्री करा. भूकंपामध्ये ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यास आग लागेल, असे काहीही करू नका. वस्तू हटवण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्या पाईप अथवा भिंतीवर सतत थाप मारत रहा. बचाव पथकाला तुम्ही कुठे आहात, याची माहिती मिळेल यासाठी या या आवाजाची मदत होईल.