Explore

Search
Close this search box.

Search

November 14, 2024 1:02 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Pimple Nilkh : सचिन साठे फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी विद्यार्थ्यांचा होणार गुणगौरव

एमपीसी न्यूज – शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य, पर्यावरण (Pimple Nilkh)अशा विविध क्षेत्रात सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने मागील वीस वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्या अंतर्गत यावर्षी गुरुवारी (दि.15) दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

15 ऑगस्ट,  सकाळी 10 वाजता, पिंपळेनिलख येथील मुख्य बस स्टॉप चौकात, मनपा शाळेसमोर आयोजित केलेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आदींच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी बारावीतील प्रथम गुणवंत विद्यार्थ्याला स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप स्मृती पुरस्कार आणि रोख रक्कम पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दहावीतील प्रथम गुणवंत विद्यार्थ्याला स्वर्गीय सुरज काळुराम नानगुडे स्मृती पुरस्कार रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच, स्कूल बॅग आणि सन्मानचिन्ह तसेच इतर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

Talegaon Dabhade :भाजप विद्यार्थी आघाडीने रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने बुजवले; वारंवार निवेदन देऊन प्रशासनाला येईना जाग

यावेळी सचिन दगडू कणसे, समाधान बाबर, श्रीमती अरुणा विलास सूर्यवंशी, पै. रोहित माकर, शामराव केदारी, जयवंतराव रानवडे, सुनील बबनराव अडसुळे, राजूभाऊ गुंड, नितीन पाटील, भगवानराव इंगवले, अनुष्का सचिन साठे, राकेश गिरमे आदींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलिब्रिटी अँकर आर. जे. अक्षय करणार आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर