एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 262 पोलीस शिपाई पदांसाठी ( Pimpri Chinchwad Police Recruitment ) पोलीस भरती सुरु आहे. भरतीची लेखी परीक्षा आज (रविवारी, दि. 10) सकाळी दहा वाजता ताथवडे पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठ येथे होत आहे. 262 जागांसाठी 2989 उमेदवार आज लेखी परीक्षा देणार आहेत. दरम्यान लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांची राहण्याची सोय केली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या चौक नियोजनात लेखी परीक्षा पार पडत आहे.
राज्यात 9 हजार 595 पोलीस शिपाई पदे, 1 हजार 686 चालक पोलीस शिपाई पदे, 4 हजार 449 सशस्त्र पोलीस शिपाई पदे, 101 बॅंण्डसमन पदे, 1 हजार 800 कारागृह पोलीस शिपाई पदांची भरती सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 262 पडे भरली जाणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी 79 पदे, महिला 78 पदे, खेळाडू 15 पदे, प्रकल्पग्रस्त 14 पदे, भूकंपग्रस्त 4 पदे, माजी सैनिक 41 पदे, अंशकालीन पदवीधर 11 पदे, पोलीस पाल्य 7 पदे, गृहरक्षक दल 13 पदे, अनाथ 3 पदे राखीव आहेत.
भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या ( Pimpri Chinchwad Police Recruitment ) उमेदवारांमधून 1:10 प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले आहे. त्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. 40 टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.
पिंपरी चिंचवड पोलिसांचे चोख नियोजन
लेखी परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रावर योग्य बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत वरिष्ठ लक्ष ठेवून आहेत.
उमेदवारांच्या राहण्याची सोय
लेखी परीक्षेसाठी राज्याच्या विविध भागातून उमेदवार पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. काही उमेदवार शनिवारी रात्री परीक्षा केंद्रावर आले. या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांची पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे महिला आणि पुरुष उमेदवारांची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केली. रविवारी सकाळी या उमेदवारांना चहा-नाश्ता देखील देण्यात आला. शनिवारी रात्री सुमारे साडेतीनशे उमेदवार मुक्कामी होते.
लेखी परीक्षेसाठी चोख बंदोबस्त
लेखी परीक्षेसाठी चार पोलीस उपायुक्त, नऊ सहाय्यक पोलीस आयुक्त, 31 पोलीस निरीक्षक, 133 सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, 444 पोलीस अंमलदार आणि 20 वार्डन असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे भरती प्रक्रियेचे दक्षता अधिकारी आहेत. अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी हे प्रभारी अधिकारी तर पोलीस उपायुक्त (मुख्यालय) माधुरी कांगणे-केदार या समन्वय अधिकारी आहेत.
12 हजार उमेदवार मैदानी मधूनच बाहेर
पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 262 जागांसाठी राज्यभरातून 15 हजार 42 अर्ज आले. त्यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनिअर यासह पदव्युत्तर पदवी धारकांचा देखील समावेश होता. दोन तृतीयपंथी उमेदवारांनी देखील अर्ज केला. मात्र मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होऊन लेखीसाठी अवघे दोन हजर 989 उमेदवार पात्र ठरले. उर्वरित 12 हजार 53 उमेदवार मैदानी चाचणी मधूनच बाहेर ( Pimpri Chinchwad Police Recruitment ) पडले.
लेखीसाठी बोलावण्यात आलेले प्रवर्गनिहाय उमेदवार (भरली जाणारी पदे)
ईडब्ल्यूएस – 63 (23)
एसईबीसी – 249 (24)
इमाव – 1219 (99)
विमाप्र – 142 (13)
भ.ज.-ड – 0
भ.ज.-क – 152 (12)
भ.ज.-ब – 71 (7)
वि.जा.-अ – 121) 10
अ.ज. – 215 (20)
अ. जा. – 757(54)
अराखीव 0
https://youtube.com/shorts/hFgmvf4395Y?si=-31uo-smU0ZB_XLp