Explore

Search
Close this search box.

Search

November 15, 2024 12:07 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Chinchwad : तुम्ही पर्यावरणाला वाचवा पर्यावरण तुम्हाला वाचवेल – डॉ भारती चव्हाण

एमपीसी न्यूज – नागरीकांनी स्वतःच्या हव्यासासाठी (Chinchwad) वृक्षतोड केली आहे. प्रत्येकाने ठरवले पाहिजे माझ्या मुळे वृक्षतोड, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. परिवर्तनासाठी प्रत्येक घटकांनी सामाजिक बांधिलकी समजून वृक्षारोपण केले पाहिजे आणि वृक्षरोपण हे फक्त शासनाचेच काम नाही ते आपले काम आहे. आपल्या कुटुंबाएवढाच वेळ पर्यावरणासाठी दिला पाहिजे, असे सांगत तुम्ही पर्यावरणाला वाचवा पर्यावरण तुम्हाला वाचवेल, असा सल्ला कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी दिला.

गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पिंपळे गुरव येथे वृक्ष दिंडी काढली. पिंपळे गुरव येथील 8 टू 80 उद्यानाच्या बाजूला प्रथम वृक्षमित्र अरुण पवार व डॉ भारती चव्हाण यांनी वृक्ष पालखीचे पुजन केले. यावेळी चव्हाण बोलत होत्या.

दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळ चालला आहे, प्रत्येकाने झाडे लावून जगवले पाहिजेत. देशी झाडे लावली पाहिजेत असे मत मंडळाच्या अध्यक्षा डॉ भारती चव्हाण यांनी वृक्षरोपणाच्या वेळी व्यक्त केले.

दिगंबर राणे यांनी गणेश वंदना म्हटली. वृक्षदिंडी मध्ये मंडळाचे कोअर कमिटी सदस्य  (Chinchwad) आण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत हभप रामदास साबळे होते. तर किरण कांबळे यांनी डोक्यावर झाड, तोंडाला ऑक्सीजनचा मास्क लावून पर्यावरणाचा संदेश दिला. वृक्षवल्ली आम्हां, सोयरे, वनचरे असे भजन म्हणत पर्यावरणाचे स्लोगन हातात घेऊन वृक्षदिंडी काढली. वृक्षप्रेमीनी वृक्षदिंडीत फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला.

वृक्ष लागवड करून पर्यावरणाशी आदराने वागण्याचा सल्ला वृक्षमित्र अरूण पवार यांनी दिला. ते म्हणाले, आपल्या कुटुंबाप्रमाणे निसर्गावर प्रेम करा. तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे “वृक्षवल्ली आम्हां, सोयरे, वनचरे या अभंगाप्रमाणे निसर्गाशी आदराने वागा. सर्वांनी वर्षभर, वृक्ष लागवड व संगोपन आपापल्या परीने चालू ठेवा. आजचे पर्यावरणाचे रक्षण म्हणजे उद्याच्या तरुण पिढीच्या ऑक्सिजनची सोय असे प्रतिपादन वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले. वायु प्रदूषण ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे आव्हान यावेळी वृक्षमित्र अरुण पवार यांनी दिले. त्यांनी सर्व 500 झाडे मोफत वृक्षरोपणासाठी मोफत दिले. मंडळांनी केलेल्या उपक्रमाची उपस्थितांना वृक्षरोपणाच्या वेळी माहिती शहराध्यक्ष शरीफ महमंदशरीफ मुलानी यांनी दिली.

Dighi : पादचारी महिलेचे दीड लाखाचे गंठण हिसकावले

 

वृक्ष लागवडीमध्ये मराठवाडा जनविकास संघ, एन्व्हायरमेंट कंजर्वेशन असोसिएशन तसेच तिरंगा क्रीडा मित्र मंडळ यांनी सहभाग नोंदवला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार, कोअर कमिटी सदस्य व पर्यावरण तज्ञ तानाजी एकोंडे, सचिव राजेश हजारे, भरत शिंदे, गोरखनाथ वाघमारे, काळूराम लांडगे, संगीता जोगदंड, लक्ष्मण इंगोले, अशोक सरतापे, संदीप पोलकम, शिवाजी पाटील, अण्णा गुरव होते.

चला मारु फेरफटका भजनी मंडळाचे किरण कांबळे, निनाभाऊ दुधाळ, कृष्णा परीट, रमेश बंड, गुरुदत्त भजनी मंडळाचे राजू उभे, विलास चोपडे, हभप शामराव गायकवाड, हभप राऊत महाराज, हभप कुदळे महाराज, मुलानी सिराजभाई, बळीराम कातंगळे, नंदकुमार धुमाळ, अमोल लोंढे, दत्तात्रय धोंडगे, सूर्यकांत कुरुलकर, किशोर अटरगेकर, संदीप पाटील, संतोष नलावडे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता पांचाळ, सुरेश कंक, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब साळुंके, महमशरीफ मुलानी, आण्णा जोगदंड, महेंद्र गायकवाड यांनी केले. श्रीकांत कदम यांनी आभार मानले.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर