एमपीसी न्यूज – न केलेल्या कामाच्या (Hinjawadi) पैशांची मागणी करत महिलेची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली. हा प्रकार आठ ऑगस्ट 2024 रोजी घोरपडी पुणे येथे घडला.
याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमान सियाक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या फ्लॅट मधील किचन ट्रॉलीचे काम आरोपी हनुमान आणि कैलास यांनी केले. ठरलेले पूर्ण काम न झाल्याने सहा हजार रुपये रक्कम देणे बाकी होते. ते काम कैलास याने पूर्ण केले.
Mahalunge : गॅस कटरने एटीएम तोडून 15 लाख 81 हजारांची रोकड लंपास
त्यामुळे उर्वरित सहा हजार फिर्यादी यांनी त्याला देण्याची तयारी दाखवली. यावरून आरोपी हनुमान याने फिर्यादी यांचे फोटो आणि अश्लील मजकूर (Hinjawadi) सोशल मीडियावर अपलोड करून फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादी आणि त्यांच्या पतीला फोनवरून त्रास दिला. पैसे न दिल्यास त्यांची आणखी बदनामी करण्याची आरोपीने धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा गुन्हा हिंजवडी पोलिसांनी मुंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे वर्ग केला आहे.