एमपीसी न्यूज – बनावट वस्तू विक्री केल्या प्रकरणी संत तुकाराम नगर पिंपरी(Pimpri) येथील दोन दुकानदारांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 10) दुपारी करण्यात आली.
राजेंद्रकुमार डगलारामजी कुनेचा (वय 29, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), रुपाराम बेलाजी चौधरी (वय 43, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साजिद असगरअली अन्सारी (वय 34, रा. भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Alandi: मराठा आरक्षण जनजागृती व भव्य शांतता रॅली साठी आळंदीतील मराठा बांधव पुण्याकडे रवाना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे संत तुकाराम नगर पिंपरी येथे बालाजी मार्केट आणि हनुमान सुपर मार्केट नावाची दुकाने आहेत. त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बनावट वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.