Explore

Search
Close this search box.

Search

November 13, 2024 11:45 pm

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Chakan : श्रावणामुळे फळभाज्या व पालेभाज्यांच्या आवकेत वाढ

तरकारी मालाच्या दरात वाढ
एकूण उलाढाल 3 कोटी 50  लाख रूपये
चाकण बाजारभाव – रविवार, दि. 11 ऑगस्ट, 2024

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये (Chakan) श्रावणामुळे फळभाज्या व पालेभाज्यांच्या आवकेत वाढ झाली. आवक वाढूनही तरकारी मालाचे भाव तेजीत राहिले. बीड जिल्ह्यातून डांगर भोपळ्याची मोठी आवक चाकण मध्ये झाली.  जनावरांच्या बाजारात बैल व म्हैस यांच्या भावात वाढ झाली. एकूण उलाढाल 3 कोटी 50लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1000 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 100 क्विंटलने घटल्याने भावात 350 रूपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 3  हजार रुपयांवरून 3350 रूपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 2000 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 1500 क्विंटलने घटून भावात 500 रुपयांची घट झाली.

बटाट्याचा कमाल भाव 3500 रुपयांवरून 3000  रूपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भावात 2 हजार रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव 18 हजार रुपयांवरून 20000 रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 320 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 3  हजार रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Lonavala : वेळेचे बंधन न पाळणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई

 शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे –
कांदा – एकूण आवक – 1000 क्विंटल. भाव क्रमांक – 1.  3350  रुपये, भाव क्रमांक 2 . 2700  रुपये, भाव क्रमांक 3. 2000  रुपये.
बटाटा – एकूण आवक – 2000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 3000  रुपये, भाव क्रमांक 2. 2700  रुपये, भाव क्रमांक3.2400  रुपये.

फळभाज्या –

फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – 264  क्विंटल ( 1500 ते 2500 रू. ), कोबी – 195 क्विंटल ( 1500 ते 2000 रू.), फ्लॉवर – 210  क्विंटल ( 1600  ते 2000 रु.), वांगी – 86 क्विंटल (4000 ते 5000 रु.), भेंडी – 83  क्विंटल ( 4000 ते 5000 रु.), दोडका – 58 क्विंटल ( 4000 ते 5000 रु.), कारली – 76 क्विंटल ( 3500 ते 4500 रु.), दुधीभोपळा – 78 क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), काकडी – 108  क्विंटल (1000 ते 2000 रु.), फरशी – 42  क्विंटल ( 3000  ते 4000 रु.), वालवड – 60  क्विंटल ( 5000 ते 7000 रुपये), ढोबळी मिरची – 146 क्विंटल ( 3500 ते 4500 रु.), चवळी – 38 क्विंटल ( 3000 ते 4000  रु.), शेवगा – 20 क्विंटल ( 5000 ते 7000रु.), गाजर – 135  क्विंटल ( 2000 ते 3000 रु.), गवार – 52 क्विंटल (5000 ते 7000  ),.

 पालेभाज्या –
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
मेथी – एकूण 13 हजार 600 जुड्या ( 1500 ते 1800 रुपये,), कोथिंबीर – एकूण 22  हजार 400 जुड्या ( 1000  ते 2000 रुपये,), शेपू – एकूण 3  हजार 800  जुड्या ( 600  ते 1000 रुपये ), पालक – एकूण 3 हजार 200  जुड्या ( 1000  ते 1500 रुपये),.

 जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 35 जर्शी गाईपैकी 22 गाईची विक्री झाली.(10000 ते 40000 रु.), 70 बैलांपैकी 50 बैलांची विक्री झाली.( 10000 ते 40000 रु.), 110 म्हशीपैकी 95 म्हशींची विक्री झाली.( 20000 ते 80000 रु.),4 हजार शेळ्या – मेंढ्यापैकी 3200  शेळ्यांची विक्री (Chakan) झाली. (2000 ते 15000 रु.),.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर