Explore

Search
Close this search box.

Search

March 25, 2025 3:04 pm

MPC news

Chinchwad : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमता विकसित करण्यासाठी शाळांमध्ये अनुकूल वातावरण आवश्यक – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या (Chinchwad) कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण क्षमता विकसित करण्यासाठी शाळांमध्ये अनुकूल वातावरण निर्माण करण्यास महापालिका कटिबद्ध आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची महत्वाची भूमिका राहणार आहे, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, उपशिक्षणाधिकारी बुधा नाडेकर, संगत संस्थेच्या समुपदेशन प्रमुख प्राची खांडेपाल तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक उपस्थित होते.

महापालिका शाळांमध्ये शैक्षणिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात येतात. या सर्व योजना व उपक्रमांचा अंतिम उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. त्यामुळे कला, क्रीडा, शिक्षण, नेतृत्व, संशोधन, वैज्ञानिक दृष्टीकोन असे विविध पैलू विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावेत, त्यांच्या अंगी जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम नवनवीन संकल्पना राबवून पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी महापालिका आणि शिक्षण विभाग कटीबद्द आहे, असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी (QCI) क़्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे पूर्व मुल्यांकन करण्यात येऊन शिक्षकांनी अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेचे तंतोतंत निरीक्षण करावे. तसेच महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि विकासात्मक गरजा समजून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात (Chinchwad) आली आहे. शाळांचे व शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने शाळांमध्ये मेंटोर शिक्षक देखील नेमले आहेत.

Chinchwad : मोहननगर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा – मीनल यादव

राज्य शालेय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तर गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी भारत दर्शन सहलीचे नियोजन सुरु आहे. विद्यार्थ्यांमध्ये भाषा आणि संख्याज्ञान वाढविण्यासाठी उत्कृष्ट सराव पुस्तिका तयार करण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरक्षा विषयक लेखापरीक्षण करून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला, क्रीडा विषयक शिक्षक नेमण्यात आले आहेत. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आपल्या कलागुणांनुसार कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाहीत यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. तसेच गैरहजर मुलांना शाळांमध्ये आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका महत्वाची असणार आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने सांघिक भूमिका बजावली पाहिजे, असेही आयुक्त सिंह म्हणाले.

संवादसत्रादरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये भाषाज्ञान आणि संख्याज्ञान व आकडेमोड कौशल्य विकसित करण्यासाठी विविध संकल्पनात्मक पुस्तक शिक्षण विभागाने नव्याने तयार केले आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त शेखर सिंह तसेच अतिरिक्त (Chinchwad) आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या पुस्तिकेमध्ये इयत्ता 3 री ते 8 वी तील विद्यार्थ्यांसाठी भाषा आणि गणित विषयामधील मुलभूत संकल्पनांची माहिती देण्यात आली आहे. या सक्षम कार्यक्रम पुस्तिकेची माहिती प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर