एमपीसी न्यूज – लोणावळा परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ई.(Lonavala)यांचेकरिता प्रशासनाने वेळेचे बंधन घालुन दिलेले असतानाही काही आस्थापना चालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार वेळेचे बंधन न पाळणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी कारवाई केली. लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने शनिवारी (दि. 10) ही कारवाई केली आहे.
कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट व वडगाव मावळ मधील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन ठिकाणी कारवाई झाली आहे. या बार रेस्टॉरंटचे चालक यांनी विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांच्या ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारूची विक्री केली. त्यामुळे दोन्ही बारमालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 33 (डब्ल्यू), 131 अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.
Hinjawadi : जमिनीच्या वादातून तरुणाला मारहाण दहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढे देखील सुरच राहणार आहे. आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकाने केली आहे.