एमपीसी न्यूज – शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे (Chinchwad) आमिष दाखवून एका 55 वर्षीय नागरिकाची 5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 19 फेब्रुवारी 2024 ते 24 मे 2024 या कालावधीत चिचंवड येथे ऑनलाईन पद्धतीने घडली.
फिर्यादीने याप्रकरणी सोमवारी (दि.12) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून 6282390618117 हा मोबाईल धारक, शिवांगी सारडा, यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Hinjewadi : दुकानदाराला खंडणीची मागणी करत मारहाण, दोघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विश्वास संपादन (Chinchwad) करून त्यांना शेअर्स मध्ये पैसे भरण्यास सांगून फिर्यादी यांच्याकडून 5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.