Explore

Search
Close this search box.

Search

December 4, 2024 11:39 am

MPC news

Chinchwad : शहर पोलीस दलात मोठी उलथापालथ; 19 पोलीस निरीक्षक, 5 सहायक निरीक्षक, 6 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात मोठी उलथापालथ (Chinchwad) झाली आहे. शहर पोलीस दलातील 19 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यासह पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक यांचीही बदली झाली आहे. त्याचबरोबर चार अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्ष तसेच पोलीस मुख्यालय येथे संलग्न करण्यात आले होते. त्यांचे आदेश रद्द करत त्यांना मूळ ठिकाणी पाठवण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी (दि. 12) रात्री दिले आहेत.

 

नियंत्रण कक्षातील नऊ पोलीस निरीक्षकांची पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत नेमणूक (Chinchwad) करण्यात आली आहे. 

Pune : बनावट तिकिट वापरुन प्रवास करणाऱ्या तरुणाला अटक

नेमणूक केलेले पोलीस निरीक्षक (नेमणुकीचे ठिकाण)

 

विश्वनाथ चव्हाण (भोसरी पोलीस स्टेशन)

बापू ढेरे (दिघी पोलीस स्टेशन)

संदीप घोरपडे (विशेष शाखा)

नीता गायकवाड (वाकड पोलीस स्टेशन)

नाथा धार्गे (चाकण पोलीस स्टेशन)

दीपक गोसावी (चिंचवड पोलीस स्टेशन)

निलेश वाघमारे (निगडी पोलीस स्टेशन)

रणजीत जाधव (तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन)

अरविंद पवार (विशेष शाखा)

 

पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा तसेच गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या.

 

बदली झालेले पोलीस निरीक्षक (कुठून – कुठे)

 

गोरख कुंभार (गुन्हे शाखा – वाकड पोलीस स्टेशन)

सुहास आव्हाड (गुन्हे शाखा – पिंपरी पोलीस स्टेशन)

विजयकुमार वाकसे (वाहतूक शाखा – देहूरोड पोलीस स्टेशन)

रूपाली बोबडे (विशेष शाखा – वाहतूक शाखा)

नितीन फटांगरे (भोसरी पोलीस स्टेशन – रावेत पोलीस स्टेशन)

महेंद्र कदम (रावेत पोलीस स्टेशन – वाहतूक शाखा)

रविकिरण नाळे (वाकड पोलीस स्टेशन – सायबर पोलीस स्टेशन)

अंकुश बांगर (तळेगाव एमआयडीसी सध्या संलग्न नियंत्रण कक्ष – वाहतूक शाखा)

प्रवीण कांबळे (विशेष शाखा – महाळुंगे पोलीस स्टेशन)

विजय ढमाळ (दिघी पोलीस स्टेशन सध्या संलग्न नियंत्रण कक्ष – गुन्हे शाखा)

 

पोलीस स्टेशन, विशेष शाखेत कार्यरत असलेल्या पाच सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या झाल्या

 

बदली झालेले सहायक पोलीस निरीक्षक (कुठून – कुठे)

 

सचिन कदम (देहूरोड पोलीस स्टेशन संलग्न गुन्हे शाखा – गुन्हे शाखा)

संदीप देशमुख (पिंपरी पोलीस स्टेशन – रावेत पोलीस स्टेशन)

गणेश लोंढे (विशेष शाखा – वाहतूक शाखा)

नकुल न्यामणे (आळंदी संलग्न चिखली पोलीस स्टेशन – चाकण पोलीस स्टेशन)

राम गोमारे (हिंजवडी पोलीस स्टेशन – गुन्हे शाखा)

Pune : बनावट तिकिट वापरुन प्रवास करणाऱ्या तरुणाला अटक

नियंत्रण कक्ष, महाळुंगे, भोसरी, सांगवी पोलीस ठाण्यातील सहा उपनिरीक्षकांच्या बदल्या

 

बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक (कुठून – कुठे)

 

किरण शिंदे (महाळुंगे पोलीस स्टेशन – विशेष शाखा)

अशोक केंद्रे (भोसरी पोलीस स्टेशन – शिरगाव पोलीस स्टेशन)

बालाजी जोनापल्ले (भोसरी पोलीस स्टेशन – वाकड पोलीस स्टेशन)

सूर्यभान कदम (सांगवी पोलीस स्टेशन – नियंत्रण कक्ष)

मुकेश मोहारे (भोसरी पोलीस स्टेशन – तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन)

संतोष डोलारे (नियंत्रण कक्ष – वाहतूक शाखा)

 

तीन अधिकाऱ्यांचे संलग्नतेचे आदेश रद्द

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले होते. ते आदेश रद्द करून त्यांच्या नेमणुकीच्या मूळ ठिकाणी चिंचवड पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आले.

 

पोलीस उपनिरीक्षक सतेज जाधव यांची मुख्यालय येथे संलग्न करण्यात आले होते. ते आदेश रद्द करून नेमणुकीच्या मूळ ठिकाणी हिंजवडी वाहतूक विभाग येथे पाठवण्यात आले.

 

पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख यांची पिंपरी पोलीस स्टेशन ते वाकड पोलीस स्टेशन अशी बदली (Chinchwad) झाली होती. ती बदली रद्द करण्यात आली आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर