Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 8:16 pm

MPC news

Hinjawadi : सुरक्षा साहित्य न वापरल्याने 14 व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर काम करताना (Hinjawadi) सुरक्षा साहित्य न वापरल्यामुळे 14 व्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 30 जुलै रोजी सकाळी भोईरवाडी, फेज तीन, ता. मुळशी येथे 32 पाईन वूड ड्राईव्ह या बांधकाम साईटवर घडली.

उस्मान शराफत शेख (वय 20, रा. नांदे रोड, म्हाळुंगे, ता. मुळशी. मूळ रा. पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. शहाजान शेख (वय 35, रा म्हाळूंगे, पुणे. मूळ रा. पश्चिम बंगाल), सेफ्टी सुपरवायजर अमित शांताराम चव्हाण (वय 29, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे यांनी सोमवारी (दि. 12) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै रोजी सकाळी साडे अकरा (Hinjawadi) वाजताच्या सुमारास भोईरवाडी फेज तीन येथे सुरु असलेल्या 32 पाईन वूड ड्राईव्ह या बांधकाम साईटवर काम करताना कामगार उस्मान शेख 14 व्या मजल्यावरून खाली पडला. त्याला औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Pimpri : ‘हा कसला भाऊ, हा तर ओवाळणी खाऊ’, ठाकरे गटाचे रवी राणा यांच्याविरोधात आंदोलन

याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याचा तपास करत असताना पोलिसांनी आठ जणांचे जबाब नोंदवले. त्यानंतर पोलिसांनी सेफ्टी सुपरवायजर आणि रेडी मिक्स कॉंक्रीटचे काम करणाऱ्या दोघांवर गुन्हा नोंदवला. बांधकाम साईटवर काम करणारे कामगार सुरक्षा साहित्याशिवाय काम करू नये याची जबाबदारी असताना आरोपींनी निष्काळजीपणा केला. कामगार उस्मान शेख याने सुरक्षा साहित्य न वापरल्याने तो 14 व्या मजल्यावरून खाली पडून मयत झाला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर