एमपीसी न्यूज – लोणावळा येथील वेहेरगाव (Lonavala)येथे बकीदेशिर जुगार अड्ड्यावर छापा टाकून तेथून ड्रग्स सह पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करंटा आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शन खाली लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (दि.12) रात्री केली.
या कारवाईत पोलिसांनी 10 जुगार खेळणाऱ्या ना ताब्यात घेतले आहे. राहुल भरत इंगुळकर (वय 34 वर्ष रा. वाकसई,मावळ) संतोष ज्ञानदेव बोत्रे (वय 36 वर्ष रा. वेहेरगांव,मावळ) मंगेश विठ्ठल देशमुख (वय 46 वर्ष रा. वेहेरगांव, मावळ), संजय विठ्ठल देशमुख (वय 43 वर्ष रा. वेहेरगांव, मावळ) दिनेश पांडूरंग गायकवाड (वय 40 वर्ष रा. वेहेरगांव, मावळ), चंद्रकांत हौजी देवकर (वय 42 वर्ष रा. वेहेरगांव ता. मावळ), विनोद शरद नाणेकर (वय 42 वर्ष रा. बेहेरगांव ता. मावळ),अजित सुनिल देवकर (वय 29 वर्ष रा. वेहेरगांव ता. मावळा) मंगेश मारुती राणे (वय 40 वर्ष रा. कामशेत , मावळ) संतोष काशिराम दळवी (वय 45 वर्ष रा. बेहेरगांव ,मावळ) हे पैशांवर तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना मिळून आले.
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे. त्यावरून सहायक.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी सोमवारी रात्री पथकासह सापळा रचुन वेहेरगाव येथील श्री मडवी यांचे बंगल्यामध्ये छापा टाकला.छाप्यामध्ये पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन झडती घेतली असता आरोपी संतोष काशिराम दळवी (वय 45 वर्ष, रा बेहेरगांव ता. मावळ) याने स्वतःचे पॅन्टच्या खिशामध्ये 2.030 ग्रॅम वजनाचे 20 हजार 300 रुपयांचे एम.डी पावडर हा अमली पदार्थ विक्रीकरिता आणला होता.
Hinjewadi : दुकानदाराला खंडणीची मागणी करत मारहाण, दोघांना अटक
पोलिसांनी या कारवाईमध्ये वर नमुद सर्व आरोपींचे ताब्यातून रोख रक्कम, वाहने व इतर साधने असा एकूण रु 74 लाख 14 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. याचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक पोलीस निरीक्षक शेवते, शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, गणेश येळवंडे, मंगेश मारकड यांचे पथकाने केली आहे.