एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ( Pimpri) ग्रंथालय, संगणक कक्ष व विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन बाललेखिका आराध्या नंदकरच्या हस्ते झाले.
या प्रसंगी संत साहित्याचे अभ्यासक तसेच चौदा टाळकरी या पुस्तकाचे लेखक ह.भ.प श्रीरंग गायकवाड,उपजिल्हाधिकारी पुणे जिल्हा तथा संतपीठ अभ्यास समिती सदस्य राजीव नंदकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली बाललेखिका आराध्या राजीव नंदकर, संचालक ह.भ.प राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ.स्वाती मुळे, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, पालक शिक्षक संघटना सदस्य उपस्थित ( Pimpri) होते.
Pune : गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज, पुणे पोलिसांची गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यां सोबत बैठक
अवघ्या दहा वर्षाच्या वयात पुस्तक लिहिणाऱ्या आराध्या नंदकर हिच्या हस्ते ग्रंथालय, संगणक कक्ष व विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आराध्या आणि पत्रकार श्रीकांत गायकवाड यांची ज्योती लोखंडे आणि पवित्रा के. यांनी मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी मुक्त संवाद साधला. आराध्याने विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. तसेच आपल्या दैनंदिन व्यस्त दिनचर्या आणि वाचन व तिच्या भविष्यातील पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती ( Pimpri) दिली.यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. श्रीकांत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना संत साहित्य आणि संतांचे चरित्र एकनाथ महाराज व गावबाचे उदाहरण देऊन विद्यार्थी जीवनातील अवांतर वाचन व लेखनाचे महत्व यावर मार्गदर्शन केले. राजीव नंदकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संतपीठाचे पालक गोविंद एकनाथ पाटील यांनी ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतपीठाच्या शिक्षिका, दीपमाला जयस्वाल, सुवर्णा वाघ, सुचेता पुजारी यांनी तर आभार प्रदर्शन समन्वयिका मयुरी मुळूक यांनी केले. संतपीठाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. सखाराम पितळे यांनी पसायदानाने कार्यक्रमाची ( Pimpri) सांगता केली.