Explore

Search
Close this search box.

Search

November 15, 2024 4:53 am

MPC news
ठळक बातम्या
Helios Business Park

Pune : गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज,  पुणे पोलिसांची गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यां सोबत बैठक

एमपीसी न्यूज –  आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची ( Pune) बैठक शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सोमवारी (दि.12) आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. बैठकीत विविध मंडळांचे 600 पदाधिकारी सहभागी झाले होते. 

 

यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रवीण पाटील, मनोज पाटील, शैलेश बलकवडे यावेळी उपस्थित होते .

 

Chinchwad : शहर पोलीस दलात मोठी उलथापालथ; 19 पोलीस निरीक्षक, 5 सहायक निरीक्षक, 6 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

उत्सवाच्या काळात होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिकेचे काम शहरात सुरू आहे. उत्सवाच्या कालावधीत विकास कामे संथगतीने करावीत, जेणेकरून कोंडी होणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक नियोजनाची जबाबदारी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांकडून नियोजन करण्यात येणार आहे. गर्दीच्या मार्गाची पाहणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. खड्डे बुजविण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे,  तसेच  पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला वैभवशाली परंपरा आहे. विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. विभागनिहाय बैठका अयाोजित केल्या जाणार आहेत. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली

मंडपामुळे वाहतुकीस अडथळआ होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. अनेक ( Pune) मंडळे वर्गणी न घेता. उत्सव साजरा करतात. जाहिरात कमानीच्या माध्यमातून मंडळांना निधी उपलब्ध होतो. काही मंडळांकडून तात्पुरते स्टाॅल भाड्याने दिले जातात. स्टाॅल आणि कमानी उभ्या करताना वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी नमूद केले.

नवीन मंडळाच्या नोंदणीसाठी एक खिडकी योजना

ज्या मंडळांकडे परवाने आहेत. त्यांनी नव्याने परवाने घेण्याची गरज नाही. परवाने पाच वर्षांसाठी देण्यात आले आहेत. ज्या मंडळांकडे परवाने नाहीत. अशी मंडळांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले. मंडळांना काही अडचण आल्यास त्यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

दहा दिवस मद्य विक्री बंद ठेवण्याची मागणी

पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या. उत्सवाच्या कालावधीत मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तस्करांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करून अमली पदार्थ विक्री बाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात ( Pune) आले.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर