एमपीसी न्यूज – बनावट तिकिट वापरुन विमान प्रवास करणाऱ्या ( Pune) तरुणाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. तरुणाला विमान तिकीट काढून देणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सलीम गोलेखान (वय 27, रा. मोहननगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. त्याला विमान तिकीट काढून देणारा ट्रॅव्हल कंपनीतील एजंट नसरुद्दीन खान (रा. उर कत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमानतळ प्रशासनाच्या वतीने तुषार विश्वनाथ अंधारे (वय 32, रा.धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pimpri : शहर राष्ट्रवादी काँग्रेस बचतगट महासंघ सेलची जम्बो कार्यकारिणी जाहीर
सलीमकडे तिकिटाबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा उत्तर प्रदेशातील एजंट नसरुद्दीन खान याने तिकीट काढून दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सलीमविरुद्ध गु्न्हा दाखल करून त्यालाा अटक केली. एजंट नसरुद्दीन याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. सलीमला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी ( Pune) दिली.