एमपीसी न्यूज – उसने घेतलेले पैसे (Wakad) परत मागितले म्हणून तीन ते चार जणांनी नागरिकाला घेऊन धमकी देत दहशत निर्माण केली आहे. ही घटना शनिवारी वाकड येथील चाय चस्का कॅफे समोर घडली.
याप्रकरणी संचित बबनराव पंडित (वय 38 रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कैलास खुशाल सोनवणे (वय 38) योगेश खुशाल सोनावणे (वय 36), दिनेश चतुर पवार (वय 30), अनिल साळुंखे (वय 55) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Pune-Nagpur AC Special : लॉंग विकेंड निमित्त पुणे-नागपूर दरम्यान विशेष रेल्वे
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना भेटण्यासाठी बोलवले यावेळी फिर्यादी यांनी आरोपींकडे त्यांचे पासे मागितले. मात्र आरोपींनी पैसे न देता फिर्यादीला घेराव घालून शिवीगाळ करत बदनामीची (Wakad) व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीनुसार घरा बाहेर येवून धमकी दिली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.