Explore

Search
Close this search box.

Search

November 7, 2024 7:36 pm

MPC news

YCMH : कोलकाताच्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ वायसीएममधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – कोलकत्ता येथील सरकारी रुग्णालयातील (YCMH )महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ वायसीएममधील निवासी डॉक्टरांनी आज (मंगळवारी) आंदोलन केले.

कोलकत्ता येथील सरकारी रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरचा बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर  (Resident Doctors) आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या कृत्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध शहरात त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

PMRDA News : पीएमआरडीएच्या दक्षता अधिकारी पदी अमोल तांबे यांची नियुक्ती 

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही आंदोलन केले. काही काळ काम बंद केले होते.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर