एमपीसी न्यूज – भावाला ‘दुचाकी का घेऊन गेला’ (Bhosari)असा जाब विचारत त्याच्यावर कैचीने वार केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आईवर देखील कैचीने वार करण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि. 13) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथील श्रीराम कॉलनी मध्ये घडली.
शरद अर्जुन गालफाडे (वय 36, रा. श्रीराम कॉलनी, आळंदी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम अर्जुन गालफाडे (वय 27) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद, त्यांच्या पत्नी, आई आणि वडील असे घरी असताना आरोपी भाऊ घरी आला. त्याने शरद यांना ‘तू ज्युपिटर गाडी का घेऊन गेला’ असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर खिशातून टोकदार धारदार कैची काढून शरद यांच्या गळ्यावर, छातीवर, तोंडावर, हातावर, पायावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी आई मध्ये आली असता तिला देखील हातावर व पोटावर वार करून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहे.