एमपीसी न्यूज – विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा (Chikhali) मृत्यू झाला. ही घटना मोशीतील जाधववाडी परिसरात घडली. तरुण फोनवर बोलत असताना त्याने विजेची तार पकडली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
रामब्रज हरिसिंग तेगोर (वय 22, पडवळनगर, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Chinchwad : बापूंचे मिशन पेंडन्सी
वरिष्ठ निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 11) सकाळी रामब्रज हे फरशी बसविण्याचे काम करण्यासाठी जाधववाडी, मोशी येथे आले होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रामब्रज यांना फोन आला. फोनवर बोलण्यासाठी ते गॅलरीमध्ये गेले. या घरासमोरून विजेची तार गेली होती. बोलताना अचानक रामब्रज यांनी विजेची तार हातात पकडली.
यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून ते खाली कोसळले. ते भाजल्याने (Chikhali) त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.