Explore

Search
Close this search box.

Search

March 21, 2025 5:01 pm

MPC news

Chinchwad : बापूंचे मिशन पेंडन्सी

एमपीसी न्यूज – पोलीस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्षे पेंडिंग (Chinchwad) असलेल्या गुन्ह्यांची निर्गती करण्यासाठी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी ‘मिशन पेंडन्सी’ हा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र पथक तयार केले असून या पथकाकडून केवळ पेंडिंग गुन्ह्यांची निर्गती केली जात आहे. दररोज होणाऱ्या निर्गातीचा आढावा पोलीस उपायुक्त बापू बांगर दररोज घेत आहेत. त्यामुळे पेंडिंग गुन्हे निर्गत होत आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस ठाण्यातील प्रलंबित गुन्हे निर्गत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी ‘मिशन पेंडन्सी’ हा उपक्रम सुरु केला. परिमंडळ दोन मधील वाकड, हिंजवडी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी आणि शिरगाव या पोलीस ठाण्यातील चार रीडर (अंमलदार) आणि एक अधिकारी असे एक पथक तयार केले. त्यांचा एक व्हाटसअप ग्रुप तयार केला. त्या ग्रुपमध्ये स्वतः उपायुक्त बांगर देखील आहेत.

प्रत्येक पोलीस ठाण्याला ठराविक दिवसांसाठी टार्गेट दिले आहे. त्या पोलीस ठाण्यातील पथकाने दिलेले टार्गेट पूर्ण करायचे आहे. हे टार्गेट पूर्ण करत असताना कामात हलगर्जीपणा होऊ नये. यासाठी पर्यवेक्षण अधिकारी नेमण्यात आले आहेत. गुन्हे निर्गत करताना कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते.

Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे नगरपरिषद कार्यालय येथे प्रथमोपचार पेटी लोकार्पण

दिवसभर केलेल्या कामाचा पोलीस उपायुक्त दररोज सायंकाळी आढावा घेतात. त्या दिवशी केलेले काम, त्यात आलेल्या अडचणी याबाबत उपायुक्त बापू बांगर मार्गदर्शन करतात. दुसऱ्या दिवशी केल्या जाणाऱ्या कामाचे आदल्या दिवशी रात्रीच नियोजन केले जाते.

‘मिशन पेंडन्सी’चे असे चालते कामकाज

प्रलंबित गुन्ह्यात जबाब घेणे, गुन्ह्याचे चार्जशीट तयार करणे, पंचनामे करणे (Chinchwad) याचे प्रथम काम केले जाते. त्यानंतर जखमी प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांची जुळवणी केली जाते. त्याची स्क्रुटिनी केली जाते. या टप्प्यात कागदपत्रे उपायुक्त कार्यालयाकडे सादर केली जातात. त्यानंतर गुन्ह्या बाबतचा अद्ययावत तपशील पोलिसांच्या ऑनलाईन प्रणालीत (सीसीटीएनएस) नोंदवला जातो. त्यानंतर झेरॉक्स आणि इतर कामे केली जातात. त्यानंतर प्रकरण न्यायालयात सादर केले जाते.

गुन्हे पेंडिंग राहण्याची कारणे

  • गुन्ह्यात पुढे कारवाई न करण्याबाबत न्यायालयाचे आदेश
  • गुन्हा रद्द करण्याची न्यायालयात मागणी केल्याने
  • चार्जशीट न्यायालयात सादर न होणे
  • जबाब राहिल्याने
  • पंचनामे न झाल्याने
  • इतर कारणे

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर