Explore

Search
Close this search box.

Search

November 6, 2024 12:46 am

MPC news

Pimpri : जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत 1537 खेळाडूंचा सहभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri) आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन दि. 5 ते 12 ऑगस्ट 2024 या कालावधीत इंद्रायनीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडासंकुलात करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे 559 शाळांमधील 1537 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल, दिघी विरुद्ध प्रियदर्शनी स्कूल यांच्यात अंतिम लढत रंगली. यामध्ये प्रियदर्शनी स्कूलच्या शरयू रांजणे हिने एकेरी प्रकारात आर्मी पब्लिक स्कूलच्या गार्गी कामठेकर हिच्यावर 15-4 आणि 15-4 असा एकतर्फी विजय मिळवला. तसेच प्रियदर्शनी स्कूलच्या अपूर्वा घोळवे आणि शरयू रांजणे यांनी दुहेरी प्रकारात आर्मी पब्लिक स्कूलच्या अद्विका पवार आणि शिप्रा कदम यांच्यावर 15-7 आणि 15-4 अशी मात केली.

Chinchwad : बहिणाबाई प्राणी संग्रहालयासाठी आणखी 24 कोटींची निविदा, संग्रहालय वर्षभर बंदच

जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेतील 17 वर्षाखालील मुलांच्या गटात चिखली येथील जी जी इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध दिघी येथील एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल या संघात अंतिम लढत पहायला मिळाली. यामध्ये जी जी इंटरनॅशनल स्कूलच्या शार्दुल आवारी याने एकेरी प्रकारात एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूलच्या आरव राय याचा 15-9 आणि 15-6 असा पराभव केला. त्याचबरोबर दुहेरी प्रकारात जी जी इंटरनॅशनल स्कूलच्या अर्णव बोराटे आणि शार्दुल आवारी यांनी एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूलच्या आरव राय आणि प्रतिक (Pimpri) शितोळे यांच्यावर 15-14 आणि 15-11 असा विजय मिळवला.

17 वर्षाखालील मुलांच्या सामन्यात आर्मी स्कूल, दिघी यांनी द्वितीय क्रमांक, काशी विश्वेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल, दिघी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच एस एन बी.पी. इंटरनॅशनल स्कूल, चिखली उपविजेते ठरले. त्याचबरोबर 14 वर्षांखालील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल, दिघी यांनी द्वितीय, वालटन स्कूल, वाकड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड उपविजेते पद पटकावले.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर