Explore

Search
Close this search box.

Search

January 13, 2025 6:11 pm

MPC news

Pimpri : शहरात डेंग्यूचे 67 तर झिकाचे 5  रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णांची (Pimpri)संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात आत्तापर्यंत 67 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. 8 जणांना चिकुनगुनिया, तर 5 जणांना झिकाची लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये 3 गर्भवती महिलांचा समावेश आहे.

डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका नियंत्रणासाठी महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डेंग्यू मुक्त शहर अभियान राबविण्यात येत आहे. डासोत्पतीस कारणीभूत ठरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. डासोत्पतीची ठिकाणे नष्ट करून औषध टाकण्यात येत आहे.

Talegaon Dabhade : अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी

शहरात सध्य:स्थितीत 67 जणांना डेंग्यू, 8 जणांना चिकुनगुनिया, तर 5 जणांना झिकाची लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये 3 गर्भवती महिलांचा समावेश आहे. या  तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच गर्भवती महिलांना झिका व डेंग्यु या आजाराची ताप, सांधेदुखी, डोळयांच्या मागे दुखणे आदी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर