Explore

Search
Close this search box.

Search

January 13, 2025 8:01 pm

MPC news

Pune: पीएमपीएमएल ची संपूर्ण माहिती मिळणार केवळ एका टच वर, “आपली पीएमपीएमएल” अॅप होणार लॉन्च

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या “आपली पीएमपीएमएल” या(Pune) मोबाईल अॅपचे उद्या (दि.15) उद्घाटन स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करणेत येणार असून प्रवाशांच्या सेवेत “आपली पीएमपीएमएल” हे मोबाईल अॅप दि.17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.

सदरचे मोबाईल अॅप हे गुगल प्ले स्टोअर वर “Apli PMPML” या नावाने उपलब्ध असून अॅन्ड्रॉईड मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येईल.

“आपली पीएमपीएमएल” या मोबाईल अॅपची ठळक वैशिष्ट्ये पुढीप्रमाणेः-

सर्व बसमार्गांची माहिती समजणारः-

प्रवाशांना त्यांच्या करंट लोकेशन वरून इच्छित स्थळी जाणेसाठी आवश्यक असलेल्या बसमार्गाची माहिती

मोबाईल अॅप वर समजणार.

Talegaon Dabhade : अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी

बसचे लाईव्ह ट्रॅकिंग होणारः-

मोबाईल अॅप मधून बसचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना दिसणार आहे. यामुळे बस थांब्यावर किती वेळात येणार हे देखील समजणे शक्य होणार आहे.

ऑनलाईन तिकीट काढता येणारः-

सदर मोबाईल अॅप वरून प्रवाशांना ऑनलाईन तिकीट युपीआय द्वारे बुक करता येईल.

दैनंदिन पास देखील काढता येणारः-

सदर मोबाईल अॅप वरून प्रवाशांना रू. 40, रू.50 व रू. 120 चे दैनंदिन पास काढता येणार आहेत.

तक्रार नोंदविता येणारः-

सदर मोबाईल अॅप वरून प्रवाशांना त्यांच्या तक्रारी देखील नोंदविता येणार आहेत.

“आपली पीएमपीएमएल” मोबाईल अॅप वरून मेट्रो तिकीट देखील काढता येणारः-

“आपली पीएमपीएमएल” मोबाईल अॅप वरून प्रवाशांना मेट्रो चे तिकीट देखील काढता येणार आहे.

तरी जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी “Apli PMPML” या मोबाईल अॅपचा वापर करावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करणेत येत आहे.

तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परिवहन महामंडळाच्या गुणवंत कामगार व अधिकाऱ्यांचा सत्कार देखील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करणेत येणार येणार आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर