एमपीसी न्यूज – टपरी चालकाला मारहाण करत (Sangvi) त्याच्याकडून हप्ता वसुली करणाऱ्या स्वयंघोषित भाईला सांगवी पोलिसांनी इंगा दाखवला. टपरी चालकाकडे हप्त्याची मागणी करत त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी कारवाई केली. खाकीचा धाक बघताच स्वयंघोषित भाई गयावया करू लागला.
श्यामबहादुर प्रतापसिंह (वय 41, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार नकुल उर्फ नक्या गायकवाड (वय 20), त्याचा मित्र आकाश उर्फ आक्या शिवशरण (वय 19, दोघे रा. जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, एका टपरी चालकाला बरणीने आणि हाताने मारहाण करत त्याच्याकडे हप्त्याची मागणी करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मंगळवारी (दि. 13) व्हायरल झाला. हा व्हिडिओ सांगवी पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी हप्ता मागणाऱ्या स्वयंघोषित भाई नक्या याला ताब्यात घेतले.
BJP : भाजपा माजी नगरसेवक शिळीमकर यांच्यासह चार जणावर गुन्हा दाखल
आरोपी नक्की हा टपरी चालक प्रतापसिंह यांच्याकडे 100 रुपयांचा हप्ता मागत होता. प्रतापसिंह यांनी त्याला 100 रुपये दिले. त्यानंतर देखील आरोपीने प्रतापसिंह यांना धमकवून मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून पान शॉपच्या गल्ल्यातून जबरदस्तीने सहा हजार रुपये काढून घेतले.
पोलिसांनी नक्की याला ताब्यात घेतले. त्याला खाकीचा धाक दाखवला. त्यानंतर तो गयावया करू (Sangvi) लागला. त्याने हा गुन्हा कबूल करत पुन्हा असे कृत्य करणार नाही, अशी विनवणी करत कुणीही अशा प्रकारचे कृत्य करू नये असे आवाहन केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.