एमपीसी न्यूज : खासदार सुप्रिया सुळे यांचे (Supriya Sule) सोशल मीडिया खाते हॅक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने याबाबत फिर्याद दिली असून, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुळे यांचे सोशल मीडियातील खाते हॅक केल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे नगरपरिषद कार्यालय येथे प्रथमोपचार पेटी लोकार्पण
सोशल मीडियातील खाते हॅक करून हॅकरने 400 डॉलरची मागणी केली. याबाबतचा मेसेज प्रसारित झाल्यानंतर सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने तक्रार दिली.
पोलिसांनी याबाबत सोशल मीडिया चालक कंपनीशी संपर्क (Supriya Sule) साधला. त्यानंतर त्यांच्या सोशल मीडियातील खात्याचे नियंत्रण हॅकरकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले.