Explore

Search
Close this search box.

Search

January 13, 2025 6:12 pm

MPC news

Talegaon Dabhade : अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी

 अजित  पवार व  सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत साजरे होणार रक्षाबंधन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ( Talegaon Dabhade) जनसन्मान यात्रा येत्या शुक्रवारी (16 ऑगस्ट) तळेगावमध्ये येत आहे. या यात्रेदरम्यान अजितदादा प्रामुख्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ तसेच अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणार आहे. जन सन्मान यात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात जय्यत तयारी सुरु आहे.

अजितदादांच्या जन सन्मान यात्रेची सुरुवात नाशिकमध्ये झाली.त्यानंतर नगर जिल्ह्यातून ही यात्रा पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या स्वागतासाठी तळेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. जन सन्मान यात्रा तळेगाव येथे सकाळी नऊ वाजता मारुती मंदिर चौकाजवळील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेच्या मैदानावर येणार आहे. पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात येत आहे. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या रस्त्यांवर भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पक्षाचे झेंडे लावून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

Bhosari: दुचाकी घेऊन गेल्याच्या कारणावरून आई आणि भावावर कैचीने वार 

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध लोकोपयोगी योजना, जनहितासाठी घेतलेले निर्णय याची माहिती अजितदादा या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने जनतेला देणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. शेती पंपांवरील वीज बिल माफी तसेच मावळातील पर्यटन, कृषी पर्यटनाला कशी गती मिळेल याबाबत अजितदादा मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शेळके यांनी दिली.

जन सन्मान यात्रेबरोबरच रक्षाबंधनही

मावळ तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 50 हजारांहून अधिक माता-भगिनींनी नावनोंदणी केली. या योजनेचा लाभ तालुक्यातील किमान 80 हजार भगिनींना मिळाला पाहिजे,हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आपले प्रयत्न सुरू आहेत. या सर्व भगिनींनी कार्यक्रमाला येऊन अजितदादांना राखी पौर्णिमेनिमित्त भेट द्यावी, असे आवाहन आमदार शेळके यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे तालुक्यातील महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील हजारो भगिनी सहभागी होणार असून अजितदादा व आमदार शेळके यांना प्रतिनिधिक राखी बांधून आभार व्यक्त करणार ( Talegaon Dabhade) आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर