आजचे पंचांग (Today’s Horoscope 14 August 2024 )
आजचा दिवस – बुधवार.
तारीख – 14.08.2024.
शुभाशुभ विचार- 12 नंतर चांगला.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – 12.00 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- अनुराधा 12.13 पर्यंत, नंतर ज्येष्ठा.
चंद्र राशी- वृश्चिक.
—————————–
मेष- ( शुभ रंग- राखाडी)
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. नवीन झालेल्या ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. वैवाहिक जीवनातही जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
व्यापाऱ्यांसाठी आज उत्तम दिवस. भागीदारांमध्ये सलोख्याचे संबंध राहतील. महत्त्वाचे निर्णय घेताना थोडी द्विधा मनस्थिती होणार आहे. वैवाहिक जीवनात तू तिथे मी असे वातावरण राहील.
मिथुन (शुभ रंग – भगवा)
नोकरांना वाढीव जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे. मातुल घराण्याकडून काही महत्त्वाच्या बातम्या येणार आहेत.
कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
तरुणांच्या चैनी व विलासी वृत्ती बळावेल. आज हौस मौज करण्याकडे तुमचा कल असेल. आवक जरी पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे.
Maharashtra : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
सिंह ( शुभ रंग- गुलाबी) (Today’s Horoscope 14 August 2024 )
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात प्रगती राहील. गृहिणी समाधानी व मुले आज आज्ञेत असतील.
कन्या (शुभ रंग- आकाशी)
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादाला कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. घराबाहेर वाद स्वभावतात.
तूळ (शुभ रंग- जांभळा)
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहजच उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.
वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. एखाद्या विवाह समारंभात हजेरी लावाल.
धनु (शुभ रंग- निळा)
खर्चाचे प्रमाण वाढले तरी पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.
मकर (शुभ रंग- आकाशी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य राहील. अधिकारी वर्गाला अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करण्याची आज तुमची तयारी असेल.
कुंभ ( शुभ रंग- मोरपिशी)
कार्यक्षेत्रात अनुभवी लोकांचे मार्गदर्शन गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.
मीन (शुभ रंग- मरून)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडासा विरोधी दिवस. नोकरीत वरिष्ठांचे समाधान होणे आज तरी शक्य नाही. व्यवसायात काही आकस्मिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424