एमपीसी न्यूज -आजचे पंचांग (Today’s Horoscope 15 August 2024 )
आजचा दिवस – गुरुवार.
तारीख – 15.08.2024.
शुभाशुभ विचार- आनंदी दिवस.
आज विशेष- स्वातंत्र्य दिन.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 3.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र- ज्येष्ठा 6.47 पर्यंत नंतर मूळ.
चंद्र राशी- वृश्चिक 12.53 पर्यंत नंतर धनु.
—————————–
मेष- ( शुभ रंग- निळा)
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आहे. सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. घरातील थोरांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. काही दूरचे प्रवास संभवतात.
वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
आज काम कमी व दग दगच जास्त संभवते. कार्यक्षेत्रात काही मनस्ताप देणाऱ्या घटना घडल्याने थोडी चिडचिड होईल. महत्त्वाचे निर्णय आज पत्नीच्या सल्ल्यानेच घ्या.
मिथुन (शुभ रंग – भगवा)
नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. आज सहकारी वर्गाशी सामंजस्याचे धोरण ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी.
कर्क ( शुभ रंग- चंदेरी)
अति महत्त्वाकांक्षांना आवर घालून आज थोडे तब्येतीवर लक्ष द्यायला हवे. पथ्य पाणी अवश्य पाळा. अन्यथा एखादा बरा झालेला आजार पुन्हा डोके वर काढू शकतो.
सिंह ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
परिवाराच्या हितासाठी आज काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मुलांचे अनावश्यक लाड आवरते घेणे हिताचे आहे. गृहिणीसाठी व्यस्त दिवस असून स्वतःकडे दुर्लक्ष होईल.
कन्या (शुभ रंग- आकाशी)
कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. आज काही बोअर करणारी माणसे भेटतील. आज मोफत सल्लागार मंडळींना दुरूनच नमस्कार करा. वाद विवाद टाळावेत.
तूळ (शुभ रंग- जांभळा)
आज आवक पुरेशी असल्याने तुमचा मूडही चांगला असेल. स्वतःच्या आवडी निवडी वर वेळ व पैसाही खर्च करता येईल. नावे ठेवणाऱ्या मंडळींकडे दुर्लक्ष करा.
वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा)
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असून सर्व दैनंदिन कामे विना व्यत्यय पूर्ण होतील. दुपारनंतर एखादा अपेक्षित लाभ संभवतो. शब्द जपून वापरा.
धनु (शुभ रंग- मरून)
आज काही दूर चे नातलग संपर्कात येतील. विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी मनाजोगती घटना घडेल. छान दिवस.
मकर (शुभ रंग- गुलाबी)
आज योग्य आर्थिक नियोजन गरजेचे आहे. असलेला पैसा जपून वापरायला हवा. संध्याकाळी एखादा मोठा खर्च करावा लागेल. थकीत बिले भरावी लागतील.
कुंभ ( शुभ रंग- आकाशी)
कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या कष्टांची फळे मिळतील. नव्या व्यावसायिकांना यश दृष्टीक्षेपात येईल. तुमची सकारात्मकता वाढेल. नकारात्मक लोकांना दुरच ठेवा.
मीन (शुभ रंग- सोनेरी)
पैशाचे योग्य नियोजन व वेळेचा सदुपयोग करूनच कार्यक्षेत्रात यशाची चक्रे गतिमान ठेवता येतील. आप्तस्वकीय मंडळींना हेवा वाटण्याजोगी कामगिरी करू शकाल.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424