एमपीसी न्यूज : लोणावळा शहराला 333 कोटी 56 लाख (Lonavala) रुपयांचा जागतिक दर्जाचा स्कायवॉक दिला आहे. येथील पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी महायुतीच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी दिली आहे.
लोणावळा शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजित पवार यांची जन संवाद यात्रा आली होती. यावेळी लोणावळा शहरातील विविध संघटना ज्यामध्ये हॉटेल असोसिएशन, टॅक्सी संघटना, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना, टपरी संघटना अशा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. येत्या 20 ऑगस्ट रोजी मुंबई येथे संयुक्त बैठकीत वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून या सर्व विषयांवर तोडगा काढण्याचे आश्वासन अर्जदारांना पवार यांनी दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार, आमदार सुनील शेळके, सुरेश आण्णा घुले, बापूसाहेब भेगडे, दीपक हुलावळे, गणेश खांडगे, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव मंजूश्री वाघ, उमा मेहता, सुरज चव्हाण, भरत येवले, मारुती देशमुख, रवी पोटफोडे, जीवन गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहर व परिसरामध्ये सुरू असलेल्या विकास कामांची माहिती अजितदादा यांना दिले तसेच लोणावळा शहरातील विविध संघटनांच्या समस्या विशद केल्या.
अजित पवार म्हणाले जनसमान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या (Lonavala) महिला, मुली, शेतकरी, दुग्ध व्यवसाय यांच्या करिता असलेल्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. अजित पवार म्हणाले पर्यटनासाठी महाराष्ट्रातल्या काही मोजक्या शहरांप्रमाणे लोणावळा शहर हे उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित पर्यटन करता यावे याकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे. लॉंग वीकेंड आला की लोक फिरायला निघतात, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बाहेर जाण्याची प्रवृत्ती नागरिकांमध्ये वाढू लागली आहे.
लोणावळ्यात खूप निसर्ग रम्य ठिकाणे आहेत. आम्ही लहान असताना पवार साहेबांच्या सोबत लोणावळ्यात येत असे. विकास होत असताना व्यवसायात बदल होणे अपेक्षित आहे. काळानुरूप काही बदल होत असताना आपण व्यवसाय कोठे केला पाहिजे याचा विचार आताच केला पाहिजे. हे सांगताना अजित दादा यांनी खोपोली व खंडाळा भागातील काही भजी व वडापाव यांच्या दुकानांच्या जुन्या आठवणी सांगितल्या.
पीएमआरडीएच्या (Lonavala) माध्यमातून स्काय वॉक प्रकल्प करत आहोत. खोल व्हॅली वर टफन ग्लास असणार आहे. तो करण्यासाठी टॉप मधील कंपनी निवडण्याचे काम आम्ही करत आहोत. टाटा कंपनी सोबत बोलून जल पर्यटनासाठी परवानगी द्या अशी मागणी करणार आहे. सरकार म्हणून काय करायचे ते करेल पण येणाऱ्या निवडणुकीत आमच्याकडे लक्ष ठेवा अशी मिश्किल टिपणी देखील दादांनी केली.
Maval : अजितदादांच्या जन सन्मान यात्रेला मावळात ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी!
लोणावळा हे पर्यटकाचे ठिकाण आहे. या ठिकाणी ड्रग्स सारखे प्रकार सुरू आहेत. हा गंभीर विषय आहे. नवीन पिढी बरबाद करण्याचा कोणाला अधिकार नाही. कोणाच्या तरी आर्शिवाद शिवाय (Lonavala) हे शक्य नाही. पोलिसांना मी वार्निंग देतो खडक कारवाई करा अशा प्रकार पुन्हा कानावर येऊ देऊ नका. कायदा सर्वांना सारखा आहे हे ध्यानात घ्या, कायद्याची कडक अंमलबजावणी करा. कायदा तुमच्या हातात आहे तुम्ही कडक ॲक्शन घ्या, कारवाई केली नाही तर तुमच्यावर कारवाया होईल.
लोणावळा नगर परिषद शाळा ह्या मराठी माध्यमाच्या आहे. विद्यार्थी घट होत असल्याने अनेक शाळा बंद पडू लागल्या आहेत. सर्व शाळा सेमी इंग्रजी करा. मुख्याधिकारी याबाबत प्रस्ताव तातडीने तयार करा, फंड लागला तर डीपीडीसीमधून देतो. गोर गरीबांचे मुले सेमी इंग्रजी मध्ये शिकली पाहिजे. शासकीय क्रीडा संकुल जागा असेल तर प्रस्ताव तयार करा. राजकारण आणू नका, मला सुचवा लगेच मान्यता देतो. ऑक्सिलियम कॉन्व्हेंट ते व्हिपीएस दरम्यान पथ वे बनवा. टपरी धारकांनी टपरी लावताना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हॉटेल व्यवसायाला चालना देण्यासाठी महायुती कटिबध्द आहे. पण चुकीचे काम खपवून घेतले जाणार नाहीत. नगर परिषदेने जी कामे ताबडतोब करायची त्याचे प्रस्ताव तयार करा लगेच रिझल्ट देतो. रस्ता, फिल्टर प्लांट, एसटीपी प्लांट याकरता लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून देतो असे सांगितले.