एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Balewadi) रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शनिवारी (दि. 17) राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-बेंगलोर महामार्गावर जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि अति महत्वाच्या व्यक्ती तसेच खासगी वाहने व सुमारे 900 बस मधून मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमाला येणार आहेत. मुंबई-बेंगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत जड-अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई-बेंगलोर महामार्गावरून चांदणी चौक ते उर्से टोल नका दरम्यान येण्यास-जाण्यास जड अवजड वाहनांना बंदी असेल.
चाकण येथून पिंपरी-चिंचवड मार्गे बेंगलोर महामार्गावरून येणाऱ्या जड-अवजड वाहनांना बंदी असेल.
पुण्याकडून मुंबईकडे मुंबई-बेंगलोर महामार्गावरून येणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.
तळेगाव, देहूरोड मार्गे मुंबई बेंगलोर महामार्गावर येण्यास जड-अवजड वाहनांना बंदी असेल. यातून अत्यावश्यक सेवेतील वाहने व कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश असेल.
Assembly Election : कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक; तारखा जाहीर
पुणे पोलिसांनी बाणेर रोडवरील वाहतूक वळवली
विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे (Balewadi) जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळण घेऊन किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.
मुंबई-बेंगलोर बायपास वरून बाणेर रोडवर जाणाऱ्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळून हायस्ट्रीट मार्गे गणराज चौकातून जावे.
पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोड मार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौक मार्गे जावे. किंवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोडमार्गे जावे.
पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक-पाषाण रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक-बाणेर रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल-औंध रोडवर शनिवारी पहाटे बारा ते मध्यरात्री बारा पर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल.