एमपीसी न्यूज – जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (Chikhali) टाळगाव चिखली येथे शाळेच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन शाळेचे संचालक ह.भ. प.राजू महाराज ढोरे प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळूक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉ.सूरज गिरी, डॉ. स्वप्निल चौधरी चिखली गावातील स्थानिक डॉक्टर,औषध विक्रेते, पॅथॉलॉजी, चिंतन समिती सदस्य, माजी सैनिक,चिखली गावातील ग्रामस्थ, तसेच पालक, यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.
डॉ. चौधरी यांनी संतपीठातील विद्यार्थ्यांचे कौतुक करताना संतपीठ म्हणजे खरोखरच संस्कारपीठ आहे असा उल्लेख केला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात संचलन मानवंदनेने झाली. संचलनामध्ये एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संचलन प्रमुख म्हणून इयत्ता (Chikhali) आठवीची विद्यार्थी भक्ती यारोळकर हिने काम पाहिले.
Pimpri : अधिकारी कर्मचा-यांनी घेतली तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ मुक्ततेची शपथ
यावेळी अर्जित कराड याने मराठी तर आराध्या दराडे हिने इंग्रजी, यश शर्मा हिंदी आणि गौरी एखंडे हिने संस्कृत भाषेतून भाषण केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राजगुरू, भगतसिंग आणि चंद्रशेखर यांच्या इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा व फासावर जाणारा प्रसंग पाहून प्रेक्षकांना अश्रु अनावर झाले. शाळेचे सुरक्षा कर्मचारी ज्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा दिलेली आहे त्या सर्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन दीपमाला जयस्वाल, पवित्रा के यांनी केले.आभार प्रदर्शन नेहा नाफडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संगीत शिक्षिका नेहा नाफडे, श्रुती तनपुरे, गायत्री थोरबोले यांच्या सुमधुर वंदे मातरम गायनाने झाली. संतपीठ संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे, प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.