Explore

Search
Close this search box.

Search

May 24, 2025 6:18 am

MPC news

Chikhali : शस्त्रे घेऊन काढलेले फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – कोयता, पालघन अशी (Chikhali) हत्यारे घेऊन काढलेले फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 15) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घरकुल चौक, चिखली येथे करण्यात आली.

मुस्तफा मकबूल पटेल (वय 21, रा. कासारवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon Dabhade : सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

पोलिसांनी (Chikhali) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पटेल याने त्याच्या इंस्टाग्राम अकउंटवर कोयता, पालघन अशी घातक बेकायदेशीर शस्त्रे घेऊन काढलेले फोटो पोस्ट केले. याबाबत चिखली पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला कोयत्यासह ताब्यात घेतले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर