Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 8:14 am

MPC news

Chinchwad : सकल मराठा परिवारतर्फे भक्ती शक्ती येथे भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज : सकल मराठा परिवार, पिंपरी – चिंचवड, पुणेतर्फे (Chinchwad) 15 ऑगस्ट रोजी भक्ती शक्ती येथे घेण्यात आलेल्या रक्तदान व आरोग्य शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

सकल मराठा परिवार ही एक नॉन पॉलिटिकल सामाजिक संघटना आहे. मराठा बांधवांना नोकरी, शिक्षण व्यवसाय यामध्ये मार्गदर्शन करणे हे संघटनेचे मुख्य उद्दिष्ट असून मेडिकल अथवा कुठल्याही आपत्कालीन मदतीसाठी संघटना कधीही जात धर्म पहात नाही व निःस्वार्थ भावनेने मदत करत असते. संघटनेचे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात सभासद असून प्रत्येक गरजू बांधवांना मदत करण्यासाठी सर्व सभासद व ऍडमिन टीम नेहमीच सज्ज असते.

Ravet : भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

भक्ती शक्ती येथील 15 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या उपक्रमामध्ये 201 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच 150 जणांचे मोफत डोळे तपासणी व कॅल्शियम तपासणी करण्यात आली. त्याच सोबत अनेक गरजू रुग्ण्यांची मोफत ऑपरेशन करून (Chinchwad) देण्यासाठी नोंदणी करून घेण्यात आली व मोफत गोळ्या औषध वाटप करण्यात आले.

Ravet : भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

आलेल्या सर्व ऍडमिन व स्वयंसेवक टीमला सकल मराठा परिवार महाराष्ट्र राज्य समन्वयक दिनेश कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. उपक्रम पूर्ण करण्यासाठी विजय कदम, पंकज पाटील, हिरामण तांबे, वैभव ढोकळे, युवराज सुरवसे, सागर तापकीर, सुभाष पिंगळे, आनंद टमके, मनोज निर्मळ, नवनाथ मोरे, शिरीष देवरे, कैलास पडवळ, दत्ता माने संग्राम मगर, ईश्वर राऊत व सर्व ऍडमिन व स्वयंसेवक टीमने प्रयत्न केले.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर